#PKLSeason10 (#GGvPAT Match 11) : पाटणाची गुजरातवर 33-30 अशी मात…

अहमदाबाद :- प्रो-कबड्डी लीगमध्ये गुरुवारी झालेला दुसऱ्या सामन्यात पाटणा संघाने गुजरातवर 33-30 अशी मात केली. या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिली. पाटणा संघाने आक्रमक चाली रचल्या होत्या मात्र, त्यांना त्याचे लोणमध्ये रुपांतर करता येत नव्हते. गुजरात जायंट्सनेही कडवी लढत देत त्यांचा बचाव भेदत महत्वपूर्ण गुणांची कमाई केली.
पाटणाकडून पहिल्या सत्रात एम. सुधाकरने ३ तर अमित जगलनने २ यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले. गुजरातकडून सोरव गुलिया व राकेश संगोरीया यांनी प्रत्येकी ३ गुणांची कमाई केली. पहिले सत्र संपले तेव्हा दोन्ही संघांची १२-१२ अशी बरोबरी झाली होती.
Another thriller of the night ✨🤩
Pirates hand the Giants their first defeat of #PKLSeason10.
Watch all the action in #PKLSeason10 LIVE on the Star Sports Network and for free on the Disney+ hotstar mobile app 📲#GGvPAT #PKL #ProKabaddi #HarSaansMeinKabaddi pic.twitter.com/eny8xRIq8u
— ProKabaddi (@ProKabaddi) December 7, 2023
दुसरे सत्र सुरु झाल्यावर पाटणा संघाच्या निरज कुमारने अचानक आक्रमक खेळ करत संघासाठी चार गुण मिळवले व आघाडीही मिळवून दिली. हीच आघाडी पाटणा संघाने सातत्याने वाढवली व गुजरातवर दडपण टाकले. त्यांनी रेड व टॅकल गुणामध्येही बाजी मारली. गुजरातचा संघ एखाद्या नवख्या संघासारखा चाचपडताना दिसला.
Pro Kabaddi 2023 : बंगालची जयपूरला कडवी लढत; सामन्यात 28-28 अशी बरोबरी…
राकेश संगोरीयाने याही सत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करताना पाठोपाठ लोण चढवले. त्याच्या आक्रमणासमोर एकक्षण पाठणा संघ हतबल झाला होता. त्याने हा सामना २८-३० असा रंगतदार वळणावर आणला. मात्र, पाटणा संघाने पुन्हा एकदा धडक मारली व लोण चढवले. गुजरातने प्रतिकार केला मात्र, पाटणासमोर त्यांचा खेळ खूप संथ ठरला व अखेर पाटणा संघाने बाजी मारत हा सामना ३३-३० अशा फरकाने जिंकला.





