अहमदाबाद :- प्रो कबड्डीतील (प्रो कबड्डी 2023) बंगाल वॉरियर्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील 10वा सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटी हा सामना 28-28 असा बरोबरीत सुटला आणि या सामन्यातून दोन्ही संघांचे 3-3 गुण झाले.
प्रो-कबड्डी लीगमध्ये गुरुवारी झालेला पहिला सामना चाहत्यांसाठी गुणवत्तेच्या स्पर्धेची पर्वणी ठरला. बंगाल वॉरिअर्स व जयपूर पिंक पॅंथर्स यांच्यात झालेली ही लढत अखेरच्या सेकंदापर्यंत रंगली. मात्र, दोन्ही संघांना 28-28 अशा बरोबरीवरच समाधान मानावे लागले.
💥💥💥
A match that had us on the edge of our seats 🤯#ProKabaddi #PKL #PKLSeason10 #BENvJPP #HarSaansMeinKabaddi #BengalWarriors #JaipurPinkPanthers pic.twitter.com/PkDjWBaHam
— ProKabaddi (@ProKabaddi) December 7, 2023
या सामन्यात पहिल्या सत्रात जयपूरने 13-9 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. मात्र, दुसरे सत्र सुरु झाले व बेंगालनेही कडवी लढत दिली. सामना संपण्याच्या काही क्षण आधी दोन्ही संघांची 23-23 असी बरोबरी झाली होती. मात्र, जयपूरचे आक्रमण थोपवण्यात बेंगालला यश आले व त्यांनी सातत्याने लोण चढवले तसेच बचावही सर्वोत्तम केला. अखेर हा सामना 28-28 असा बरोबरीत सुटला.
जयपूरकडून भवानी राजपूतने सर्वाधिक 10 लोण चढवले. त्यंनी 17 रेड गुणांची कमाई केली व 9 टॅकल गुण मिळवताना वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, अखेरच्या १० मिनिटांत बंगालनेही त्यांना तोडीसतोड खेळ केला.
बंगालच्या श्रीकांत जाधवने 7, नीतिन धनखरने 5 तर मनींदर सिंगने 4 गुणांची कमाई केली व मोक्याच्या क्षणी लोण चढवले. त्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांचा बचाव भेदण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही व अखेरहा सामना 28-28 असा बरोबरीत सुटला. सामन्यात बरोबरी झाल्याने दोन्ही संघांना गुणांचा लाभ तर झालाच परंतू त्यांचे स्पर्धेतील आव्हानही भक्कम झाले.