Pimpri : कोयत्यासह तरुणास अटक
Updated On:

पिंपरी : बेकायदेशीररित्या कोयता बाळगणार्या एका तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. ही घटना बुधवारी (दि. १२) रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली.
अभिजित भारत शिंदे (वय २३, रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार सागर दशरथ अवसरे यांनी गुरुवारी (दि. १३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित याच्याजवळ कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक कोयता हस्तगत करण्यात आला. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





