Pimpri : भूतान देशात पेट्रोल 60 रुपये तर भारतात का नाही – इम्रान शेख

पिंपरी : केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात गुरुवारी (दि. १७) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने दुचाकी हातगाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले. “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल” “नही चाहिये अच्छे दिन वापस लाव पुराने दिन” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनास महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, माजी नगरसेविका प्रियंका बारसे,अरुण पवार, यांच्यासह युवक तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, 2014 पूर्वी कच्चा तेल 140 डॉलर प्रति बॅरल असताना भारतामध्ये 60 रुपये दराने पेट्रोल डिझेल मिळत होते. त्यावेळी दहा पैशांनी पेट्रोल वाढले असता रस्त्यावर उतरणारे भाजप नेते आज मूग गिळून गप्प का आहेत? आज 2025 साली कच्चे तेल 70 रुपये प्रति बॅरल असून पेट्रोल डिझेल 120 रुपयांच्या दराने नागरिकांना विकून केंद्र सरकार आणि तेल कंपन्या नफाखोरी करत आहे.
भारताकडून तेल आयात करणाऱ्या भूतान या देशात 60 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळत असल्याच्या घटनेकडे इमरान शेख यांनी लक्ष वेधले. यावेळी बोलताना ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. याचा विचार करून सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती त्वरित कमी कराव्यात.





