Pimpri : भरधाव टेम्पोने तीन पादचाऱ्यांना उडवले; एकाचा मृत्यू
Updated On:

पिंपरी : भरधाव वेगातील टेम्पोने तीन पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना आंबेठाण रोड, चाकण येथे गुरुवारी (दि. १५) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
सतिष जयराम चव्हाण (वय २२, रा. दवडमळा, चाकण) यांनी शुक्रवारी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल, आई व ओळखीच्या महिलेबरोबर चालत असताना अज्ञात चालकाने टेम्पो भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवत त्यांना धडक दिली. यामध्ये जयराम चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर शिलाबाई व जोत्स्ना चव्हाण जखमी झाल्या. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





