पिंपरी : पूर्णानगरमध्ये दुकानांना आग; चौघांचा होरपळून मृत्यू
Updated On:

पिंपरी – पूर्णानगर येथे सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली आहे. यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अद्याप या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.





