Pimpri : पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण

पवनानगर : आजपासून (दि.२१) राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शैक्षणिक जीवनातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.
पवनानगर केंद्रावर परिसरातील अनेक शाळांमधील दहावीचे विद्यार्थी परीक्षा देणार असून येथील केंद्रावर होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती केंद्रसंचालक तथा प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.
पवनमावळ परिसरातील पवना विद्या मंदिर पवनानगर केंद्रामध्ये पवना विद्या मंदिर, वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे, भैरवनाथ विद्यालय बौर, संत तुकाराम विद्यालय शिवणे, संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, माध्यमिक विद्यालय करुंज, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय जवण अजिवली या शाळांतील एकूण ४१७ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.
दहावीती परीक्षा ‘कॉपी मुक्त’ व्हावी यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला असून दक्षता समितीचे सदस्यही मदत करीत आहेत. तसेच संपूर्ण ब्लॉकमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.





