Pimpri : वृत्तपत्र विक्रेता संघ पिंपरी विभाग प्रमुख प्रशांत साळुंखे यांचे निधन
Updated On:

पिंपरी : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या पिंपरी विभागातील वृत्तपत्र विक्रेते आणि पिंपरी विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत दशरथ साळुंखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई आणि मोठे बंधू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक तसेच पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अत्यंविधी सोमवारी पार पडला. त्यांच्या अत्यंविधीसाठी समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्िथत होते.





