Pimpri : निगडी ते पवनानगर पीएमपी बससेवेची गरज
Updated On:

पवनानगर : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत, टाकवे बुद्रुक पर्यंत बससेवा सुरू आहे. परंतु, पवन मावळमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर परिसरात पीएमपी बससेवा उपलब्ध नाही.
या भागातील अनेक विद्यार्थी पिंपरी- चिंचवड ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात. तसेच अनेक कामगार, व्यावसायिक यांचेही जाणे येणे होत असते.
यामुळे निगडी ते पवनानगर ही पीएमपी बस सुरू करावी, अशी मागणी आरपीआय पक्षाचे आठवले गटाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी केली आहे.





