Pimpri : राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज मागवले; १४ नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरु

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुर केली. आरक्षण सोडत जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शहरातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. त्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १४) पासून सुरू होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.
बहल म्हणाले, ३२ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पक्षाचे खराळवाडी, पिंपरी येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत उमेदवारांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपूर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक आदींसह आपला कार्य अहवाल जोडणे आवश्यक आहे.
महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनात्मक तयारीस सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.





