Pimpri : जगद्गुरु इंग्लिश मीडियम शाळेचे शंभर टक्के निकाल
Updated On:

देहूगाव : देहूगाव येथील साकोरे शिक्षण संस्थेचे जगद्गुरु इंग्लिश मीडियम विद्यालयाच्यादहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन केले. सलग सातव्या वर्षी विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.
विद्यालयातील दहावीच्या परीक्षेसाठी सहभागी झालेले 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये अनुक्रमे 1) आर्या विक्रमसिंह काळोखे -97.00 टक्के), 2)आकांक्षा ज्ञानेश्वर नवले (91.00 टक्के तर 3) नंदन सौदागर बोंगाळे 90.40 टक्के मिळविले आहे.
संस्थेचे अध्यक्ष संतोष साकोरे, सचिव दिपाली साकोरे ,मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडेकर,रेणुका राज,निर्मला कापरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





