Pimpri : थकबाकीदार फ्लॅटधारक सोसायटी निवडणूकीस होणार अपात्र

पिंपरी : सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट असणार्या मालमत्ता कराचा भरणा न करणार्या व्यक्तींवर अशी कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट असणार्या व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत कर असणार्या सभासदाच्या शेअर सर्टिफिकेटवर थकीत मिळकतकराची नोंद ठेवण्याबाबत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांना कळविण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. ही नोंद झाल्यानंतर हे थकबाकीदार फ्लॅटधारक सोसायटी निवडणूकीस अपात्र होणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सर्वसाधारणपणे 6 हजार 644 इतक्या गृहनिर्माण सोसायट्या कार्यरत आहेत. या सोसायट्यामधील 77 हजार 886 इतक्या सदनिकाधारकांकडे फ्लॅटधारकांकडे 180 कोटीं इतक्या रक्कमेचा मालमत्ता कर थकित आहे. करसंकलन विभागाने यापुर्वीच शहरातील सर्व सोसायट्यांना कर थकित असलेल्या फ्लॅटधारकांची यादी सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पाठविली आहे.
सर्व गृहनिर्माण सोसायटीचे सभासद नियुक्त संचालक मंडळ असते. सर्व सोसायट्या संबधित फ्लॅटधारकाला शेअर सर्टिफिकेट देते. व त्याची एक प्रत सोसायटी अध्यक्ष व सचिवांकडेसुध्दा असते. याशिवाय याची एक नोंदवही सुध्दा सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांचेकडे जतन केलेली असते. थकीत मिळकतकराची थकबाकीची नोंद संबंधित फ्लॅटधारकाच्या शेअर सर्टिफिकेटवर होण्यासाठी महापालिकेच्या वतीने सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांना विनंती केली आहे. याबाबत गरज असलेस आवश्यक तो पत्रव्यवहार उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर क्र. 3 व 6, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयाशी केला जाणार आहे. त्यामुळे फ्लॅटचे हस्तांतरण होताना थकबाकी असलेस सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र देता येणार नाही.
मालमत्ता कराचा भरणा 31 मार्च 2025 पूर्वी करावा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा रहिवासी मालमत्तेपोटी 300 कोटी, बिगरनिवासी मालमत्तेपोटी 78 कोटी इतका मालमत्ताकर दि.15 मार्च 2025 अखेर वसुल झालेला नाही. रहिवासी मालमत्ताधारकांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. आर्थिक वर्षाचे केवळ 15 दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे आपण आपला मालमत्ताकर तात्काळ महानगरपालिकेकडे जमा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
शेखर सिंह,





