Pimpri Crime | महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार ; आरोपीकडून चित्रीकरण करून ब्लॅकमेल
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – ज्यूसमधून महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच आरोपीने महिलेचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलही केले. ही घटना तळवडे येथे घडली.मनोज निवृत्ती नखाते (वय ५०, रा. सहयोगनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०२१ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडित महिलेला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपीने तिचे चित्रीकरणही केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिले तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





