Pimpri Crime | घरच्यांना मारण्याची धमकी…आणि कॅफेमधील अमानुष सत्य ; अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणीवर कॅफेमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना डुडुळगाव परिसरात घडली.नागेश पांडूरंग खलसे (वय २८, रा. राजे संभाजीनगर कॉलनी, लक्ष्मीनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि. १८) याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर २०२४ ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश खलसे याने पिडित तरुणीच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिला डुडुळगाव येथील एका कॅफेमध्ये नेऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





