Badlapur Crime News : बदलापुर पुन्हा हादरलंं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य
Badlapur Crime News : बदलापूरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरडींवर लैंगिक शोषणाची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. सर्वच स्तरातून या घटेनेचा तीव्र स्वरुपाचा निषेध नोंदवण्यात आला.

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरडींवर लैंगिक शोषणाची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. सर्वच स्तरातून या घटेनेचा तीव्र स्वरुपाचा निषेध नोंदवण्यात आला. यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना बदलापूरमध्ये घडली असून बदलापूर पुन्हा हादरले आहे.
शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने एका चार वर्षांच्या निरागस चिमुकलीचे लैंगिक शोषण केले आहे. असा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला असून, या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांना संबंधित आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं? (Badlapur Crime News)
बदलापूर (Badlapur) पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत आहे. ती नेहमीप्रमाणे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत स्कूलव्हॅनमधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईला तिची चिंता वाटू लागली. यानंतर आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर दीड तासांनंतर चिमुकली घरी परतली. त्यानंतर आईने सुटकेचा निश्वास सोडला, पण चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगिल्यानंतर आईने तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेनंतर जनमानसांत संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित चिमुकलीला मारहाण झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी या घटनेनंतर तीव्र स्वरुपाचा संताप व्यक्त केला. ज्या व्हॅनमध्ये हा निंदणीय प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न चेंदवणकर यांनी केला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने काही नियम तयार केले होते. त्या नियामांचे पालन का झाले नाही? असा जाब त्यांनी विचारला आहे.
या घटनेचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. चिमुकलीची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु असल्याची माहिती आहे. सदर घटनेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी माहिती दिली. सदर प्रकार हा स्कुल व्हॅन मध्ये घडल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : “हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी…”; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ! नेमकं काय म्हणाले?






