Pimpri Crime | ऑनलाईन लूट! ट्रॅफिक चलनाच्या नावाखाली मोबाइल हॅक ; फाईल उघडताच ८ लाख गायब
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – ट्रॅफिक चलनची पीडीएफ फाइल पाठवून एका व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये इतर खात्यात ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान चाकण येथील ऐश्वर्या अंगण सोसायटी येथे घडली.या प्रकरणी मिलिंद लीलाधर ढोले (वय 45, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. २३) चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने एपीके फाइल पाठवली. ही फाइल उघडताच फिर्यादीचा मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून एकूण 8 लाख रुपये इतर खात्यात ट्रान्सफर केले गेले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




