Pimpri Crime : खोपोलीत मोठी घरफोडी उघडकीस ; तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून लावला छडा

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – शिळफाटा डिसी नगरमधील घरफोडीत लाखो रूपयांची सोने चांदी चोरीच्या घटनेने खोपोली शहरात खळबळ उडाली होती. कोणताही विशेष पुरावा हाती नसताना पोलिसांनी परिसरापासून दूरदूरपर्यंतचे सुमारे १५० सीसीटीव्हींचे फूटेज खंगाळत चोरांचा माग काढला आणि तीन जणांना गजाआड केले. त्यांच्याकडून १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी जप्त केले आहे.
खालापूर न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विशाल तांदळे (वय -२९) रा.मुळगांव, मंचर याच्यावर २७ गुन्हे तर पप्पू देवकर (वय – २९) रा.गोकुळनगर कात्रज याच्यावर ३ गुन्हे, गणेश माळवे यांच्यावर १ गुन्हा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभीजीत शिवथरे, उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या पथकाने सुरु केला.
खोपोली, खालापुर, लोणावळा, खंडाळा, कोंढवा व कुसगांव टोलनाका व खालापूर टोलनाका परीसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासणी करण्यात आले. त्यामध्ये गुन्हयांतील आरोपी यांनी वापरलेल्या मोटारीची माहिती मिळाली. गोपनीय मा.िहतीव तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक करण्यात आली. आरोपी यांच्यासह गुन्हयात सहभागी उर्वरीत आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा शेाध सुरु आहे.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पोलीस अंमलदार पोहवा अमित सावंत, संदीप चव्हाण, पोशि रामा मासाळ, किरन देवकाते, अमोल राठोड, समीर पवार, प्रणित कळमकर, आदकाश डोंगरे यांनी जिगरबाज कामगिरी केली आहे.





