Pimpri Crime | खोटं नियुक्तीपत्र आणि खोटं आश्वासन ; नोकरीच्या नावाखाली फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका व्यक्तीने स्वतःला ग्रामसेवक भासवून शासकीय नोकरीचे आमिष दाखवत एका व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते जून २०२४ पर्यंत भोसरी येथील अंकुशराव नाट्यसभागृह येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.राजेश राकेश पासवान (रा. विजय चौक, गारखेड, छत्रपती संभाजी नगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिपक मल्लिनाथ भोसले (वय ३४, रा. भोसरी) यांनी गुरूवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी भोसले यांना ग्रामसेवक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला एकूण दोन लाख रुपये दिले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने भारत सरकारची राजमुद्रा असलेले खोटे नियुक्तीपत्रही दाखवले. मात्र, आरोपीने फिर्यादीला नोकरी दिली नाही आणि त्यांची फसवणूक केली.




