पवनानगर : येथील पवना कृषक सहकारी संस्था ही परिसरातील 40 गावांची मुख्य सहकारी संस्था आहे.या संस्थेची 2025- 2030 संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत ठरली होती; परंतु मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची सुचना दिल्यानंतर शेवटच्या दोन दिवसात दोन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी बसून बिनविरोध करत भाजपला 7 तर 6 जागा देण्याचे ठरविण्यात आले होते. दरम्यान, अचानक अपक्ष उमेदवाराने 20 मतदार आणून मतदान केले, त्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवार व नेत्यांची पळापळ झाली. शेवटच्या अर्ध्या तासात एकूण 230 मतदान झाले. परंतु अचानक गोंधळ उडाल्याने नक्की कोणत्या उमेदवारांना मतदान झाले आहे हे समजायला मार्ग नव्हता. अखेर मतदारांना भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. अनेक वर्ष संस्थेवर भाजपाचे वर्चस्व आहे काल झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 9 तर राष्ट्रवादी 4 उमेदवार निवडून आले. निवडुन आलेले उमेदवार व कंसात त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण मतदार 8 जागा- 1)भाऊ सतू सावंत (109), 2)अनिल भागू तुपे (104), 3)धोंडू शिवराम कालेकर (102), 4)बबन अर्जुन दहिभाते (97), 5)गणपत गोविंद घारे (89), 6)अंकुश तातेराम पडवळ (89), 7)किसन विष्णू घरदाळे (86) व 8) राम बारकू नढे (85). महिला प्रतिनिधी दोन जागा- 1)लक्ष्मीबाई किसन आडकर (117), 2) सुशीला रामदास घरदाळे (108) अनुसूचित जाती जमाती 1 जागा – 1) अंकुश ज्ञानदेव सोनवणे (127), इतर मागासवर्ग 1 जागा -1) शेखर मारुती दळवी (119), भटक्या विमुक्त जाती – जमाती विशेष मागास वर्ग 1 जागा 1) बाळू चिंधू आखाडे (115)