Pimpri : बीज सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

देहूगाव : श्रीक्षेत्र देहू येथील वैकुंठधाममध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशकोत्तर अमृत महोत्सव २०२५ निमित्त देहूकर सांप्रदायिक अखंड हरिनाम सप्ताह व ओळीची गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ७ मार्च पासून हा सोहळा सुरू होणार असून १४ मार्च रोजी सांगता होईल.
कीर्तन सप्ताहात हभप श्रीगुरू कान्होबा महाराज देहकर (पंढरपूर), हभप श्री.प.पू. पांडुरंग महाराज घुले (अध्यक्ष, गाथा मंदिर देहू), हभप श्री द्वारावार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर (नाशिक), हभप श्री.प.पू. उमेश महाराज दशरथे (आळंदी), हभप संतवीर बंडातात्या महाराज कराडकर, हभप चैतन्य महाराज देगलुरकर, हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कीर्तनसेवा होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या अंतिम दिवशी, पौर्णिमा दिनी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत श्रीगुरु प्रा. बाळासाहेब महाराज देहुकर (पंढरपुर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वागतोत्सुक गंगाधर कारभारी जाधव (अध्यक्ष हभप श्री आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्ट) नाशिक, विजय अण्णा गणपतराव जगताप (अध्यक्ष अखंड हरीनाम सप्ताह समिती) पिंपळेगुरव व जगन्नाथ पांडुरंग काटे (प्रमुख नियोजन समिती) पिंपळे सौदागर यांनी दिली आहे.





