कबुतरखान्याचा वाद चिघळला! मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Marathi Ekikaran Samiti । कबुतरखान्याचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दादरच्या कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचे आंदोलनकर्ते येताच काही आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतले. यावेळी मराठी एकीकरण समितीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना पकडून गाडीत टाकण्यास सुरुवात केली. गोवर्धन देशमुख यांना अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले. Marathi Ekikaran Samiti ।
जैन समाजाच्या आंदोलकांवर कारवाई केली का?
6 ऑगस्टला दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाजाने आंदोलन केले, त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केल्याचे देखील म्हंटले जात आहे.
दरम्यान, मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात यावेत असे आदेश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले होते. हे कबुतरखाने बंद करण्यात आल्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी दादरमध्ये आंदोलन करत कबुतरखान्यावर झाकण्यात आलेली ताडपत्री हटवली होती.
पोलिसांकडून परवानगी नव्हती…
यानंतर दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती तरी देखील आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनापूर्वी पोलिसांनी मराठी एकीकरण समितीला नोटीस देखील दिली होती तरी देखील आंदोलन करण्यात आले त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली.
हेही वाचा :
कबुतरखान्याचा वाद चिघळला! मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड





