#photo : मॉडर्न असो वा पारंपरिक ‘प्राजक्‍ता माळी’ दोन्ही लूक्समध्ये दिसते कमालीची सुंदर

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – मराठमोळा साज शृंगार या बाबत अलीकडे सर्वांनाच क्रेझ आहे. नऊवारी, सहावारी साडी, नथ, ठुशी, लक्ष्मी हार, मोत्याच्या कुड्या, कोल्हापुरी साज आणि असं बरंच काही फॅशनच्या दुनियेत एव्हरग्रीन हिट आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आणि छोटया पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री ‘प्राजक्‍ता माळी’ सुद्धा आपल्या अनोख्या स्टाईल मुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. मॉडर्न असो वा पारंपरिक अवतार प्राजक्ता प्रत्येक लूक मध्ये कमालीची सुंदर दिसते. 

नितळ त्वचा, नशिले डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने फॅन्सच्या हृदयात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. मराठमोळी प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.

सोशल मीडियावरील तिच्या सर्वच फोटोंवर फॅन्स ब्युटिफूल, फॅब्युलस अशा कमेंट्‌स देतात. काही जण तर तिच्या प्रेमात सुद्धा पडले आहेत. प्राजक्ताने नुकतेच एक जबरदस्त फोटोशूट केले असून, या फोटोशूटचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून, तिच्या या लूकवर असंख्य चाहत्यांच्या कमेंटस्‌ येत आहेत. तसेच लाइक्‍सचा अक्षरशः पाउस पडत आहे. यामध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून, यावर तिने नथ, ठुशी, लक्ष्मी हार असे असंख्य नक्षीदार दागिने घातले आहे. आणि याच मुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ‘टॅलेंट हंट शो’मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र