‘आईच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात फिनिक्सची भरारी’
Updated On:

नगर (प्रतिनिधी) – आईच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात “फिनिक्स’ ने भरारी घेतली आहे. करोना महामारीच्या संकटकाळात इतर आरोग्याचे प्रश्न देखील भेडसावत आहे. लॉकडाऊनकाळात नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न बिकट बनला असताना मोफत आरोग्य शिबीर मोठे आधार ठरणार आहे. या भावनेने फिनिक्स फाउंडेशन आरोग्य क्षेत्रात चांगले काम करत असल्याचे, समाजसेवक जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.
जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त फिनिक्स सोशल फउंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे ज्येष्ठ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 23 महिलांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी डॉ.संजय शिंदे, डॉ. मेहेर, माया आल्हाट, सौरभ बोरुडे, बाबासाहेब धीवर, अक्षय धाडगे, विशाल गायके, गौरव बोरुडे, मोहनीराज कुरे आदींसह नागरिक उपस्थित होते.





