Phil Salt Catch : फिल सॉल्टचा ‘सुपरमॅन’ अवतार! हवेत झेपावत एका हाताने टिपला इशान किशनचा जबरदस्त कॅच, पाहा VIDEO
Phil Salt Catch : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थराराचा परमोच्च बिंदू अनुभवायला मिळाला.

Phil Salt Superman Catch Ishan Kishan : पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या इशान किशनने आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली होती. मात्र, त्याच्या शतकी खेळीला ब्रेक लावण्यासाठी फिल सॉल्टने जो चमत्कार केला, तो पाहून खुद्द इशानलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. या अफलातून कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इशान किशनचे ‘कॅप्टन इनिंग’ –
प्रथम फलंदाजी करताना इशान किशनने मैदानाच्या चहुबाजूने फटकेबाजी केली. त्याने केवळ ३८ चेंडूत ८० धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. हैदराबादची धावसंख्या वेगाने वाढत असताना इशान वैयक्तिक शतकाकडे कूच करत होता.
फिल सॉल्टची चित्तथरारक फिल्डिंग –
𝐒𝐓𝐎𝐏 𝐖𝐇𝐀𝐓 𝐘𝐎𝐔 𝐀𝐑𝐄 𝐃𝐎𝐈𝐍𝐆 𝐀𝐍𝐃 𝐖𝐀𝐓𝐂𝐇 𝐓𝐇𝐈𝐒! 🛑
🎥 Phil Salt with an absolute one-handed screamer at the ropes 🫡
Do we already have the Catch of the Season on Day 1 of #TATAIPL 2026 🤔
Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #KhelBindaas | #RCBvSRH |… pic.twitter.com/pPax3pVNt9
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
हैदराबादच्या डावातील १६ व्या षटकात अभिनंदन सिंहच्या शेवटच्या चेंडूवर इशानने पॉईंटच्या वरून एक खणखणीत शॉट मारला. चेंडू थेट सीमारेषेच्या पार जाणार असे वाटत असतानाच, डीप बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या फिल सॉल्टने चित्त्यासारखी धाव घेतली. चेंडू डोक्यावरून जात असताना सॉल्टने हवेत उजवीकडे झेप घेतली आणि एका हाताने अशक्य वाटणारा कॅच टिपला.
कमेंटेटर्सनी सॉल्टचे वर्णन ‘सुपरमॅन’ असे केले असून, आयपीएल २०२६ मधील हा आतापर्यंतचा सर्वात सर्वोत्तम झेल मानला जात आहे. या कॅचमुळे इशान किशनला माघारी फिरावे लागले, अन्यथा हैदराबादची धावसंख्या २५० च्या पार गेली असती. सॉल्टच्या या क्षेत्ररक्षणामुळे आरसीबीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले २०२ धावांचे लक्ष्य –
या सलामीच्या सामन्यात, इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत नऊ गडी गमावून २०१ धावा केल्या. आरसीबीकडून जेकब डफी आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले, तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.





