#लोकसभा2019 ( सातवा टप्पा) : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदानाची नोंद

नवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होत आहे.

अंतिम टप्प्यातील मतदानामध्ये पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेश (13 जागा), पश्‍चिम बंगाल (9 जागा), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा), झारखंडमध्ये (3 जागा), चंडीगढमध्ये 1 जागेसाठी मतदान होत आहे.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत असून संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत सरासरी एकूण 53.03 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.

5.00 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

बिहार – 46.75 %
हिमाचल प्रदेश – 57.43 %
मध्यप्रदेश – 59.75 %
पंजाब – 50.49 %
उत्तर प्रदेश – 47.21 %
पश्चिम बंगाल – 64.87 %
झारखंड – 66.64 %
चंडीगढ – 51.18 %

Leave A Reply

Your email address will not be published.