कराड : मेडिकल असोसिएशनने बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपाला सातारा जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील साडेतीन हजारहून अधिक मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली असून पंधरा ते वीस हजार औषध विक्रेते व फार्मासिस्ट या संपात सहभागी झाले आहेत. ऑनलाईन कंपन्यांनी औषध विक्रीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. स्वतःचे भांडवल गुंतवून या कंपन्या बाजारपेठ ताब्यात घेत असून, त्यामुळे छोट्या आणि मध्यम औषध विक्रेत्यांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील पारंपरिक औषध वितरण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करत, सरकारने तातडीने संबंधित जीएसआर रद्द करून औषध विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करीत संघटनेकडून हा बंद पुकारण्यात आला आहे. (Satara News) कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुचाकीवरून मूक मोर्चा काढण्यात आला. या संपाला मेडिकल रिप्रेझेंटिव्ह, होमिओपॅथिक असोसिएशन तसेच आयएमए असोसिएशन यांनीही पाठिंबा दिला आहे. हेही वाचा : Narendra Modi : “पंतप्रधान मोदींची चीनसमोर टप्प्याटप्प्याने शरणागती”; काँग्रेसची खोचक शब्दात टीका