प्रभात वृत्तसेवा फलटण – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने हा काल शनिवार दि. 25 रोजी तो स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटण दौऱ्यावर असल्याने बदने याला सातारा येथे नेले होते. त्यानंतर रविवार दि. 26 रोजी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या या डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात मुख्य संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने हा गेली दोन दिवस फरार होता. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पंढरपूर व पुणे येथे पोलिसांनी पथके गेली होती. मात्र, तो पोलिसांना सापडला नाही. शेवटी तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यास फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले, परंतु, मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे तपासणी करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात दुसरा संशयित आरोपी प्रशांत बनकरला यापूर्वीच अटक झाली असून त्याला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.