Petrol-Diesel : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

मुंबई – देशात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. पण आज (दि. 24) गुरुवारी मात्र तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दारात कोणतीही वाढ केली नाही. बुधवारी म्हणजेच काल (दि. 23)
,किरकोळ बाजारात सकाळपासून पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ झाली. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या (एलपीजी) दरात सुध्दा 50 रूपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची कात्री लागली आहे.
दरम्यान, आज राज्यातील महत्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझीलचे दर पुढील प्रमाणे आहेत…
पुण्यात आज पेट्रोल 112.14 असून, डिझेल 94.89 प्रति लिटर आहे. कोल्हापूर मध्ये पेट्रोल 111.33 तर डिझेल 94.14 प्रति लिटर आहे. तर मुंबई शहरात पेट्रोल 111.67 रूपये आहे. तर तर डिझेल 95.85 रूपये आहे. नागपूर मध्ये पेट्रोल 111.39 तर डिझेल 94.19 प्रति लिटर आहे. नाशिक शहरात पेट्रोल 112.15 रुपये असून डिझेल 94.90 रुपये आहे.





