उद्धव ठाकरेंचा लाडक्या बहिणीला फोन; भाऊबीजेच्या शुभेच्छा देत म्हणाले “एवढी खंबीर बहीण मिळायला भाग्य लागतं…”

Sushma Andhare Facebook post : आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण म्हणजचे भाऊबीज साजरी केली जात आहे.
ठाकरे कुटुंबातही भाऊबीज निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे या उद्धव ठाकरे ठाकरेंना औक्षण करणार आहेत. या सगळ्या ठाकरे कुटुंबाच्या एकत्रीकरणाच्या घडामोडीत उद्धव ठाकरेंनी उबाठाच्या रणरागिनी मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत स्वतः अंधारे यांनी माहिती दिली आहे.
याविषयी त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच फोन झाल्याचा मोबाईल स्क्रीन शॅाटही शेअर केला आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने सुषमा अंधारे गावी गेल्या आहेत, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी मायेचा धागा तुटू दिला नाही. सकाळीच उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या, असल्याचे सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
सुषमा अंधारेंचे फेसबुक पोस्ट




