Andheri Bypoll: लोकं मला बहुमतानं विजयी करतील; ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विश्वास

मुंबई – 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी (दि.14) दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून मुरजी पटेल तर शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केलाय.
आज दोन्ही पक्षांचे उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मतदारसंघात फिरून मतदारांचा आशिर्वाद घेत आहेत. यादरम्यान, माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपल्याला बहुमताने विजय मिळणार असल्याचे म्हंटले आहे.
लटके म्हणाल्या, “शिवसेना पक्षासोबत निष्ठावंत असलेले सर्वजण माझ्यासोबत आहेत. लोकं माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला बहुमताने विजयी करतील असा मला विश्वास आहे, असे लटके यांनी म्हंटले आहे.”
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
दुसरीकडे भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी तब्बल 40 हजाराहून अधिक मते आपल्याला मिळतील आणि मीच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही पक्षांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असे म्हंटले आहे. मात्र 3 नोव्हेंबरला मतदार राजा कोणाला विजयी करणार याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून यादिवशीच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.





