कोविडमुळे आयटी क्षेत्रातील रोजगार वाढले; केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा दावा

कोची – कोविड महामारीमुळे डिजिटल सेवांची मागणी वाढली आहे त्यामुळे अनेक व्यावसायिकांना आयटी क्षेत्रात रोजगार मिळत आहे असे आयटी आणि कौशल्य विकास मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. कोची येथे सेंट तेरेसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत आयटी क्षेत्रात 18 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे भारतात लोक रोजगार गमावत आहेत या दाव्यात तथ्य नाही असे ते म्हणाले.
कोविड काळात प्रत्येक देशाला अर्थव्यवस्था, नोकऱ्या, उपजीविका इत्यादींमध्ये समान आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आम्ही या दोन वर्षांनंतर जेव्हा रिपोर्ट कार्ड पाहतो, तेव्हा भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, हे दिसून येते असे ते म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ex-fire-officer-in-mp-gets-four-years-in-jail-over-fake-degree-worked-in-dept-for-30-years/
भारतात 210 कोटी कोविड लसी दिल्या गेल्या असेही त्यांनी नमूद केले. अलिकडच्या काळात भारतातील विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला.





