Mohsin Naqvi : दिवसभराच्या ड्राम्यानंतर पाकिस्तान का मागे हटला? नक्वींनी सांगितले बहिष्कार न टाकण्याचे कारण!

भारत-पाकिस्तान सामन्यापासून वादाची सुरुवात –
हा वाद 14 सप्टेंबर (रविवार) रोजी भारत-पाक यांच्यातील सामन्यापासून सुरू झाला. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, जेव्हा पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमकडे गेले, तेव्हा भारतीयांनी दरवाजा बंद केला. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) संतप्त झाले आणि त्यांनी सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला.
मोहसिन नक्वी काय म्हणाले? –
Controversial match referee “Andy Pycroft is a favourite of India. He has been the referee 90 times in India’s matches” says Ramiz Raja pic.twitter.com/JdwGi54nJ5
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 17, 2025
पीसीबीने आयसीसीकडे पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने सहा मुद्द्यांवर उत्तर देत पीसीबीची तक्रार निराधार ठरवली. विशेष म्हणजे, पाकिस्तान-यूएई सामन्यातही पायक्रॉफ्ट हेच रेफरी राहिले. मोहसिन नक्वी यांनी संघाने माघार न घेण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “14 सप्टेंबरपासून संकट सुरू आहे. आम्हाला रेफरीच्या भूमिकेवर आक्षेप होता. काही वेळापूर्वी रेफरीने प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापकांशी बोलताना कबूल केले की, हस्तांदोलन न होणे चुकीचे होते. आम्ही आयसीसीकडे याची चौकशी करण्याची मागणीही केली होती. आमचा विश्वास आहे की, राजकारण आणि खेळ वेगळे ठेवले पाहिजेत. क्रिकेट हा खेळच राहू दे.”
हेही वाचा – Ramiz Raja : भारत-पाक वादात रमीज राजांचा दावा फसवा, पायक्रॉफ्टबाबत सत्य आलं समोर!
रेफरीची कोणतीही चूक नाही –
नक्वी पुढे म्हणाले की, बहिष्काराचा निर्णय हे मोठे पाऊल ठरले असते, ज्यासाठी पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्यात आली होती. आयसीसीने आपल्या उत्तरात स्पष्ट केले की, पीसीबीच्या तक्रारीत कोणतेही ठोस पुरावे किंवा खेळाडूंची विधाने समाविष्ट नव्हती. रेफरीवर कोणताही आरोप सिद्ध होत नाही आणि त्यांनी केवळ एसीसीच्या व्हेन्यू व्यवस्थापकाच्या सूचनांचे पालन केले होते.
हेही वाचा – UAE vs PAK : पाकिस्तानच्या सैम अयुबची खाते उघडण्यासाठी धडपड, आशिया कपमध्ये साधली डकची हॅटट्रिक!
आयसीसीने नमूद केले की, हस्तांदोलनाचा मुद्दा रेफरीच्या कक्षेत येत नाही, तर तो आयोजक आणि संघ व्यवस्थापनाचा विषय आहे. आयसीसीने शेवटी असे म्हटले की, पीसीबीची खरी तक्रार हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयाबाबत आहे, जी रेफरीकडे नव्हे, तर आयोजकांकडे मांडली पाहिजे.





