PBKS vs RCB : कृणाल पंड्याने जबरदस्त कॅच पकडताच, कोहलीच्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

PBKS vs RCB Virat Kohli celebration video viral after Shreyas Iyer dismissal : आयपीएल २०२५ मधील ३७ वा सामना मल्लानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात यजमान पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने आरसीबी समोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीच्या क्षेत्ररक्षणादरम्यान, विराट कोहलीची मैदानावर पूर्णपणे वेगळी शैली दिसली, ज्यामध्ये जेव्हा श्रेयस अय्यर बाद झाला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती की ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराटच्या सेलिब्रेशनने वेधले लक्ष्य –
आरसीबी विरुद्धच्या सामन्यात, पंजाब किंग्जला ६८ धावांच्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला, जेव्हा त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरने रोमारियो शेफर्डविरुद्ध मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जो त्याने थेट हवेत मारला. दरम्यान, लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कृणाल पंड्याने धावत जाऊन झेल घेतला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. कृणालने झेल घेताच, त्यावेळी रोमारियो शेफर्डसोबत उभा असलेला विराट कोहलीने वेगळ्या पद्धतीने या विकेट्सचे सेलिब्रेशन केले. तो थेट उडी मारून रोमारियो शेफर्डच्या कडेवर बसला. या सामन्यात श्रेयस अय्यर १० चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त ६ धावा करून बाद झाला.
Safe to say it’s been Krunal Pandya’s day so far ☀️
Rate this superb catch by the #RCB all-rounder 🔢
Updates ▶ https://t.co/6htVhCbltp#TATAIPL | #PBKSvRCB | @krunalpandya24 pic.twitter.com/CSaAgOACvr
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
नेहाल वढेराच्या रनआऊटमध्येही कोहलीने बजावली महत्त्वाची भूमिका –
This is why I pay my internet bills 😭❤
Aggressive Virat Kohli. #ViratKohli𓃵 #RCBvsPBKS pic.twitter.com/yTqd19cNOZ— Mufaddal Parody (@mufaddal_voira) April 20, 2025
Visual Representations of how Virat Kohli & RCB dealing with Punjab 😭🤣🍌#PBKSvRCB #RCBvPBKS #IPL2025 #ViratKohli #Rcb#RCBvsPBKS #PBKSvsRCB
— Ramesh (@Iam_Rameshh_) April 20, 2025
गेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेहाल वधेराला धावबाद करण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. वढेरा दुसरी धाव घेण्यासाठी एका टोकाकडे धावला, पण त्याचा तत्कालीन फलंदाजी साथीदार जोश इंगलिसने धाव घेण्यास नकार दिला. दरम्यान, नॉन-स्ट्राइक एंडवर असलेल्या कोहलीने थ्रो पकडला आणि नॉन-स्ट्राइक एंडकडे फेकला, ज्यामुळे वढेराला या सामन्यात फक्त ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात आले.
हेही वाचा – MI vs CSK सामन्यापूर्वी धोनी मुंबईच्या खेळाडूला बॅटने मारण्यासाठी धावला, VIDEO होतोय व्हायरल
पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. प्रियांश आर्यम आणि प्रभसिमरन सिंग यांनी २६ चेंडूत ४२ धावांची सलामी भागीदारी केली. पाचव्या षटकात कृणालने प्रियांशला टिम डेव्हिडकडे झेलबाद केले. त्यानंतर त्याने सातव्या षटकात प्रभसिमरन सिंगला डेव्हिडकडून झेलबाद केले. प्रियांशने १५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या आणि प्रभसिमरनने १७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. यानंतर शेवटी शशांक सिगने ३१ आणि मार्को यान्सेनने २५ धावांचे योगदान दिल्याने पंजाबला १५० धावांच्या पार जाता आले.





