PBKS vs MI : मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

PBKS vs MI Yuzvendra Chahal’s Injury Update in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफपूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. पंजाब संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यााला मुकला होता. टॉप-२ साठी शर्यत चुरशीची झाली असताना चहलची दुखापत हा पंजाबसाठी धक्का आहे. विशेष म्हणजे मुंबईविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात तो खेळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
युझवेंद्र चहलबद्दल लेटेस्ट अपडेट काय आहे?
पंजाबचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी म्हणाले की, चहल किरकोळ दुखापतीमुळे (लहानशी दुखापत) दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. परंतु, मुंबईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो उपलब्ध असणार की नाही? याबाबतही त्यांनी काही सांगितलं नाही. पंजाब किंग्जला टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
𝑩𝒊𝒈 𝒃𝒍𝒐𝒘 𝒇𝒐𝒓 𝑷𝑩𝑲𝑺! 🤕
Yuzvendra Chahal is suffering from a wrist injury and is likely to miss their crucial match against Mumbai Indians! ❌👀#IPL2025 #PBKSvMI #YuzvendraChahal #Sportskeeda pic.twitter.com/l4PhA5xSaK
— Sportskeeda (@Sportskeeda) May 25, 2025
युझीच्या अनुपस्थितीमुळे पंजाब बॅकफूटवर –
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या माहितीनुसार, चहलच्या मनगटाला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो आगामी लीग सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र, तो प्लेऑफसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. युझवेंद्र पंजाबचा मॅच विनर खेळाडू आहे, ज्याने केकेआरविरुद्ध पंजाबच्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोलकाताविरुद्ध, युझीने चार षटकांत २८ धावा देत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. ज्यामुळे पंजाबने अशक्य वाटणाऱ्या सामन्यावर नियंत्रण ठेवले. या दृष्टिकोनातून पाहिले तर, अशा सामन्यांमध्ये पंजाबला एका मोठ्या आणि अनुभवी खेळाडूची उणीव भासेल.
हेही वाचा – SRH vs KKR : हेनरिक क्लासनेच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने उडवला कोलकाताचा धुव्वा
पंजाबसाठी टॉप-२ मध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाही –
११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, संघाने १३ पैकी ८ सामने जिंकले आहेत आणि सध्या १७ गुणांसह टॉप-२ मध्ये आहे. पण जर मुंबई इंडियन्सने २६ मे रोजी होणारा हा महत्त्वाचा सामना जिंकला तर ते चौथ्या स्थानावरून थेट अव्वल स्थानावर पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत पंजाबला टॉप-२ मध्ये राहणे खूप कठीण होईल. त्यामुळे पंजाब आणि मुंबई यांच्यातील हा सामना आता दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा झाला आहे.





