Suryakumar Yadav : सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! मोडला सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम

Suryakumar Yadav Breaks Sachin Tendulkar Records : आयपीएल २०२५ च्या ६९ व्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पंजाब किंग्जविरुद्ध २५ धावा करताच सलग १४ डावात २५ हून अधिक धावा करणारा जगातील खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने या सामन्यात ३६ धावांचा टप्पा पार करत सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांपूर्वीचा खास विक्रम मोडत इतिहास रचला आहे. ज्यामुळे तो एक हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
यासह आयपीएल २०२५ च्या हंगामात ६१९ धावा करून सूर्यकुमार यादवने सचिनचा ६१८ धावांचा विक्रम मागे टाकला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला ७ गडी गमावून १८४ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.
Consistent Surya Kumar Yadav spearheads #MI‘s charge with 57(39) 👏
🎥🔽 WATCH | #TATAIPL | #PBKSvMI | @mipaltan
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
आयपीएलच्या एका हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :
- ६१९* – सूर्यकुमार यादव (२०२५)
- ६१८ – सचिन तेंडुलकर (२०१०)
- ६०५ – सूर्यकुमार यादव (२०२३)
- ५५३ – सचिन तेंडुलकर (२०११)
- ५४० – लेंडल सिमन्स (२०१५)
- ५३८ – रोहित शर्मा (२०१३)
हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने केला वर्ल्ड रेकॉर्ड! आतापर्यंत कोणालाच न जमलेला केला पराक्रम
सूर्याने टेंबा बावुमालाही टाकले मागे –
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात २५ धावा काढताच सूर्याने ही कामगिरी केली. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सलग १४ डावांमध्ये २५ हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी, टेम्बा बावुमाने सलग १३ डावांमध्ये २५ हून अधिक धावा केल्या होत्या. त्याआधी ब्रॅड हॉग, जॅक रुडोल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी ११ डावात २५ हून अधिक धावा केल्या होत्या. आता हा विश्वविक्रम सूर्याच्या नावावर आहे.





