PBKS vs DC : पंजाब-दिल्ली आयपीएल सामना अचानक रद्द, पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर घेतला निर्णय

PBKS vs DC capitals match called off due to Attack by Pakistan : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील धरमशालातील सामना रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारतातील तीन राज्यांवर हल्ला केल्यानंतर सामना अचानक मध्यभागी थांबवण्यात आला. पंजाबचा संघ १०.१ षटकांत १२२ धावांवर खेळत असताना स्टेडियममधील एक दिवा गेला. लाईट टॉवरमध्ये काहीतरी समस्या असल्यासारखे वाटत होते, पण यानंतर इतर लाईट देखील बंद करण्यात आले आणि खेळाडूंना ताबडतोब मैदानाबाहेर पाठवण्यात आले. यानंतर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सामना रद्द झाल्याची घोषणा केली.
आयपीएलवर निर्माण झाला धोका –
पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानने उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट आणि कठुआ येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जे भारताने पाडले. याशिवाय राजस्थान आणि पंजाबमधील महत्त्वाच्या शहरांवरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. पण भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्यांनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून हा आयपीएल सामना रद्द करण्यात आला.
#IPL MATCH HAS BEEN STOPPED IN DHARAMSHALA, we already know the reason🏏
Praying for every Indian citizen whoever in war situation 🙏#IPL2025 #DelhiCapitals #Punjabkings #ShreyasIyer #Axarpatel #PBKSvsDC pic.twitter.com/YQqFuUU9XE
— Arvindh Srinivasan (@dirarvindh) May 8, 2025
पंजाब-दिल्लीला मिळणार प्रत्येकी एक गुण –
IPL Governing Council chairman Arun Dhumal is seen requesting people to leave the stadium after the Punjab Kings vs Delhi Capitals match was called off in Dharamsala.
📹: @rvmoorthyhindu #IPL2025 | #PBKSvsDC pic.twitter.com/BH9jmZaYHC
— Sportstar (@sportstarweb) May 8, 2025
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील हा सामना रद्द करण्यात आला आहे आणि आता दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या सामन्यात पंजाबची स्थिती खूपच मजबूत होती, त्यामुळे त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे. बरं, ही वाईट बातमी फक्त पंजाबसाठीच नाही तर सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आहे. असे मानले जाते की आता लोक आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून, आयपीएलचे आगामी सामने देखील पुन्हा वेळापत्रकबद्ध केले जाऊ शकतात.
हेही वाचा – Varun Chakravarthy : वरुण चक्रवर्तीला ‘ती’ कृती नडली; बीसीसीआयने केली मोठी कारवाई, पाहा VIDEO
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या मुद्द्यावर एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये या हंगामातील आगामी सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. देशातील खेळाडू आणि परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी बीसीसीआयवर आहे. एवढेच नाही तर त्याचे कुटुंबही भारतात आहे, त्यामुळे लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.





