Pune District : उसाला पाच हजार रुपये दर द्या – प्रभाकर बांगर
Pune District : कारखाने लवकर सुरू झाल्याने कोवळ्या उसाचे वजन कमी भरून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने प्रतिटन ५०० रुपये अतिरिक्त द्यावेत, असेही ते म्हणाले.दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. शेतकऱ्यांना सलग आठ तास वीजपुरवठा करावा आणि रोहित्र ४८ तासांत बदलून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंगल फेज वीजजोडण्या काढून घेण्याची कारवाई थांबवावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.उसाला पहिल्या १४ दिवसांत प्रतिटन ४,५०० रुपये आणि गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी ५०० रुपये देऊन एकूण पाच हजार रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेचे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप बांगर यांनी एकलहरे ता.आंबेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी प्रमोद खांडगे,सह्याद्री भिसे,सचिन थोरवे.के.डी.सरोदे,वंदना वाघचौरे इत्यादी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले साखरेची किंमत प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशी मागणी त्यांनी केली.
कारखाने लवकर सुरू झाल्याने कोवळ्या उसाचे वजन कमी भरून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने प्रतिटन ५०० रुपये अतिरिक्त द्यावेत, असेही ते म्हणाले.दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. शेतकऱ्यांना सलग आठ तास वीजपुरवठा करावा आणि रोहित्र ४८ तासांत बदलून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. खतांच्या वाढत्या किमतींबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाज उठवावा, तसेच मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बांगर यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या सिंगल फेज वीजजोडण्या काढून घेण्याची कारवाई तातडीने थांबवावी. दिवसा सलग आठ तास वीज मिळत नसताना शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे अन्यायकारक आहे. ही कारवाई सुरूच राहिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
प्रभाकर बांगर,जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.





