मोठी बातमी…! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात; थेट समुद्रात क्रॅश
Helicopter Crash : अंदमानमध्ये मंगळवारी सकाळी पवन हंस कंपनीच्या हेलिकॉप्टरचे समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

Helicopter Crash : अंदमानमध्ये मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर उड्डाणानंतर तांत्रिक बिघाडामुळे थेट समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पोट ब्लेयर येथून मायाबंदरकडे निघाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच पायलटच्या निदर्शनास तांत्रिक अडचण आली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पायलटने धाडसी निर्णय घेत समुद्रात नियंत्रित आपत्कालीन लँडिंग केले.
सातही जणांची सुखरूप सुटका
अपघातानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून किरकोळ दुखापतींशिवाय कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पवन हंस ही देशातील अग्रगण्य सरकारी हेलिकॉप्टर सेवा कंपनी असून दुर्गम भागात प्रवासी वाहतूक आणि आपत्कालीन सेवांसाठी तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
दरम्यान, अलीकडील काही विमान दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या घटनेत पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.



