Paud Panchayat Samiti Election : मुळशीत ‘तुतारी’चा जोरदार आवाज; कोमल वाशिवलेंना महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद
Paud Panchayat Samiti Election : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार कोमल वाशिवले यांच्या प्रचार दौऱ्यात महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग.

Paud Panchayat Samiti Election – पौड आंबवणे पंचायत समिती गणात सध्या निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवार कोमल गणेश वाशिवले यांच्या प्रचार दौर्याने संपूर्ण गणाचे लक्ष वेधून घेतले आहे. काल पार पडलेल्या या दौर्याला गावागावातून मिळालेला प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या गणात राष्ट्रवादीची ‘तुतारी’ जोमात वाजणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कोमल वाशिवले यांच्या प्रचार दौर्यादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. विविध गावांत महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करत, फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी आपुलकीने पुढे येत त्यांच्याशी थेट संवाद साधला. आमच्या गावासाठी तुम्ही केलेली कामे आम्हाला माहिती आहेत.
यावेळी तुतारीला भरभरून साथ देऊ, अशा शब्दांत नागरिकांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला.या प्रचार दौर्यात कोमल वाशिवले यांनी शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्यांपासून युवक, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधला. शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
लोकांच्या समस्या ऐकून घेताना फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवणारी पंचायत समिती उभी करू, असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिला. विशेष म्हणजे महिला उमेदवार म्हणून महिलांमध्ये कोमल वाशिवले यांच्याबद्दल मोठी आपुलकी आणि विश्वास दिसून येत आहे. महिला बचत गट, गृहिणी आणि तरुणींनी त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून,
महिलांच्या प्रश्नांना समजून घेणारे आणि त्यासाठी लढणारे नेतृत्व म्हणून कोमल वाशिवले आमची पहिली पसंती आहेत, अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.प्रचार दौर्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत वातावरण तापवले असून, तुतारीच्या घोषणांनी संपूर्ण गण दुमदुमून गेला आहे.
विरोधकांच्या तुलनेत राष्ट्रवादीचा प्रचार अधिक संघटित, मुद्देसूद आणि जनतेशी थेट संवाद साधणारा असल्याची चर्चा सध्या मतदारांमध्ये रंगताना दिसत आहे.गावागावातून मिळणारा वाढता प्रतिसाद, नागरिकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता,
पौड पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बाजू भक्कम होत चालली आहे. आगामी निवडणुकीत हा गण राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरणार असून, कोमल वाशिवले यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.




