Paud Panchayat Samiti Election : राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार)च्या प्रचाराला वेग; कोमल वाशिवले यांचा पौड गणातील गावोगावी थेट संवाद
Paud Panchayat Samiti Election : मुळशी तालुक्यातील ११ गावांमध्ये कोमल वाशिवले यांचा झंझावाती दौरा; रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद.

Paud Panchayat Samiti Election – पौड पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार कोमल गणेश वाशिवले या सध्या संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार करत असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग मिळत आहे. मुळशी तालुक्यात त्यांच्या नियोजित दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध गावांना भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.
सकाळी मुळशी येथून दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला.यावेळी गोनवडी, पळसे, ढोकळवाडी, वाकड, चाचिवली, ताम्हिणी, दावडी, निवे, आडवाडी, पराते वस्ती व पिंपरी या भागांत त्यांनी भेटी दिल्या. प्रत्येक गावात नागरिकांच्या समस्या जाणून घेत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांबाबत विकासाचा सविस्तर आराखडा त्यांनी मांडला.
कोमल वाशिवले यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे.सर्वसामान्यांशी थेट संवाद, विकासाभिमुख भूमिका आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा यामुळे पौड पंचायत समिती गणात कोमल वाशिवले या निवडणूक रिंगणातील प्रभावी व आघाडीच्या उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
प्रचारात वेग
जनतेचा वाढता विश्वास, कार्यकर्त्यांचा जोश आणि विकासाचा ठाम निर्धाराने पौड पंचायत समिती गणात कोमल वाशिवले यांच्या प्रचाराने आता वेग धरला आहे.




