Patra Chawl Case : मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भाजपची भूमिका

मुंबई – पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू असताना त्यात कुठेही ईडीने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव घेतले नाही, परंतु खोटं बोल पण रेटून बोल हीच भाजपची पध्दत राहिलेली आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे ते पचनी पडत नसल्याने भाजपच्या अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भाजपची भूमिका राहिलेली आहे. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नसून केवळ नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने भाजपद्वारा असले प्रयत्न केले जात असतात, असं देखील महेश तपासे म्हणाले.
दुर्दैवाने आज बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांसारख्या विषयांकडे भाजपचे लक्ष नाही. त्यामुळे, फक्त सनसनाटी निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून भातखळकर यांनी हे ट्वीट केलेले आहे हे स्पष्ट आहे, असेही महेश तपासे म्हणाले.





