पत्रा चाळ प्रकरण: संजय राऊत्यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
Updated On:

मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी कोर्टात झालेल्या सुनावणीच्यावेळी विरोध केला. राऊत यांनी नियमीत जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावरील खटला “सत्तेचा गैरवापर” आणि “राजकीय सूडबुद्धी” चे एक उत्तम उदाहरण आहे.
सरकारला विरोध करणाऱ्यांना बळजबरीने चिरडण्यासाठी आपला बळी दिला गेला आहे असे आरोप राऊत यांच्यावतीने करण्यात आला आहे. ईडीने शुक्रवारी विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर त्या विषयी लेखी उत्तर दाखल केले, ज्यामध्ये त्यांनी राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. मात्र हा विरोध करताना ईडीने त्यात नेमक्या कोणत्या बाबींचा उल्लेख केला आहे याचा तपशील अजून उपलब्ध झालेला नाही.





