Patan Panchayat Samiti : पाटण पंचायत समितीच्या (Patan Panchayat Samiti) सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडीत तालुक्यात नवा ट्विस्ट दिसून येत आहे. सभापतिपदाचा केंद्रबिंदू आता ढेबेवाडी की डोंगर पठार, या चर्चेने जोर धरला आहे. उपसभापतीपदावर विजय पवार यांची वर्णी जवळपास निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे. पाटण तालुक्यात (Patan Panchayat Samiti) गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व आहे. 14 पैकी 13 जागा शिवसेनेकडे फक्त 1 जागा भाजपची आहे. त्यामुळे तालुक्यातील सत्तेवर शिवसेनेचा निर्णायक प्रभाव राहणार आहे. सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने उत्सुकता वाढली आहे. Patan Panchayat Samiti या पदासाठी निवडून आलेल्या महिला सदस्यांमध्ये डोंगर पठारावरील येराड पंचायत समिती गणातील विद्या शिंदे, मुरुड गणातील सविता पवार, मल्हारपेठ गणातील अर्चना पाटील, मारुल हवेली गणातील प्रियांका देसाई आणि सणबूर गणातून संपदा जाधव यांचा समावेश आहे. ढेबेवाडी विभागातून संपदा जाधव यांचे नाव सभापतिपदासाठी असल्याची चर्चा असून, उपसभापतीपदावर विजय पवार यांची वर्णी जवळपास निश्चित झाल्यामुळे सभापतिपदाच्या शर्यतीत नवे समीकरण बनू लागले आहे. शंभूराज देसाई यांच्या रणनीतीतून तालुक्यातील सर्व गटांना संतुलित संधी दिली जात आहे. यामुळे भविष्यातील मतदारसंघ बांधणीसाठी पायाभरणी झाली असून, सत्तासमीकरणावर गटाचा निर्णायक (Patan Panchayat Samiti) प्रभाव राहणार आहे. ढेबेवाडी की डोंगर पठार या केंद्रबिंदूवर सभापतीपदाची अंतिम निर्णय प्रक्रिया होणार आहे.