Satara: मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली : ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान सुरू असताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटप आणि महायुतीच्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले.

Satara: परिषद निवडणुकीवेळी झालेला संघर्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत होऊ नये, अशी वरिष्ठांची अपेक्षा होती. त्यानुसार आम्हाला सूचनाही देण्यात आल्या होत्या. राज्यात महायुती एकत्र असल्याने जिल्ह्यातही एकोपा राहावा, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी काही बाबतीत माघार घ्यावी लागली. सातार्याचे मतदान सर्वाधिक असतानाही समतोल राखण्यासाठी कमी जागा घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम आपण केले, अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान सुरू असताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटप आणि महायुतीच्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या संघर्षाची पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होऊ नये, अशी वरिष्ठांची भूमिका होती. त्यानुसार जिल्ह्यातही महायुतीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सातार्यात मतदान सर्वाधिक असतानाही राजकीय समतोल राखण्यासाठी कमी जागा स्वीकारल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण पार पाडली, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.





