आयपीएल 19 व्या मोसमासाठी 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. यावर्षीदेखील हे मिनी ऑक्शन अबुधाबीत पार पडणार आहे. या अगोदर 15 नोव्हेंबरला एकूण 10 फ्रँचायजींनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. यावेळी रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काही महत्वाच्या खेळाडूंची ट्रेड विंडोद्वारे डील झाली. राजस्थान रॉयल्सने सीएसकेच्या रवींद्र जडेजा याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या गोटात घेतलं. तर राजस्थानने कॅप्टन आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला चेन्नई सुपर किंग्सकडे पाठवलं. तर दुसरीकडे केकेआरने 12 वर्षांपासून सोबत असलेल्या विस्फोटक ऑलराउंडर आंद्रे रसेल याला रिलीज केले तर पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेल याला आपल्या संघातून रिलीज केले. P.S. 𝘞𝘦 𝘢𝘭𝘭 𝘨𝘰𝘯𝘯𝘢 𝘭𝘰𝘷𝘦 𝘵𝘩𝘪𝘴 😉🧡 Pat Cummins | #PlayWithFire pic.twitter.com/r4gtlypAY9 — SunRisers Hyderabad (@SunRisers) November 17, 2025 यानंतर सर्व क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली ती या सर्व संघाच्या कर्णधारपदी कोण असणार? रिटेन्शननंतर काही तासांनीच सीएसकेने 19 व्या मोसमासाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. ऋतुराज गायकवाड हाच चेन्नईचं नेतृत्व करणार असल्याचं सीएसकेने जाहीर केलं. त्यानंतर आता सनरायजर्स हैदराबादने आपल्या कर्णधार पदाची घोषणा केली. पॅट कमिन्स कर्णधारपदी सनरायजर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी ऑलराउंडर पॅट कमिन्स याच्यावर पु्न्हा एकदा विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदी कायम ठेवलं आहे. फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. पॅट सलग तिसऱ्यांदा सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्त्व करणार आहे. या अगोदर त्याने 2024 आणि 2025 मध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे. पॅट कमिन्स याची आयपीएल कारकीर्द पॅटने आयपीएलमध्ये हैदराबादआधी कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. पॅटने आयपीएलमधील 72 सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच पॅटने 3 अर्धशतकांसह 612 धावा केल्या आहेत. त्याला हैदराबादने 2024 साली तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या संघात दाखल करून घेतले.