प्रवाशांना मिळणार दिलासा ! देशभरात एक समान टोल लागू होणार; नितीन गडकरींची माहिती

Same Toll Across Country | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठे विधान केले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एकसमान टोल पॉलिसीवर काम करत आहे. येत्या काळात देशभरात सगळीकडे एक समान टोल आकारला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी ?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “आम्ही एकसमान टोल धोरणावर काम करत आहोत. यामुळे प्रवाशांच्या अडचणी कमी होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सोशल मीडियावरील प्रवाशांच्या तक्रारी गांभीर्याने घेत असून त्यावर काम करत आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गांवर ६० टक्के वाहने ही खाजगी आहेत. तर टोल वसूलीत त्यांना २०-६० टक्के वाटा आहे. त्यामुळे टोल आकारणी वाढली आहे. यामुळे प्रवाशांना जास्त त्रास होत आहे.”
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रीय महामार्गांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या निर्णयामुळे देशात लवकरच सगळीकडे एकसमान टोल लागू होऊ शकतो.” या निर्णयानंतर राष्ट्रीय महामार्गवरील लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. Same Toll Across Country |
महामार्ग प्रकल्पांबाबत गडकरींनी दिली माहिती
दरम्यान, २०२३-२४ मध्ये टोल वसूल ६४,८०९.०६ कोटी रुपये झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत ही ३५ टक्के जास्त आहे. सध्या चालू वर्षात आतापर्यंत ७००० किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पूर्वी मंत्रालयात ३००० कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता. Same Toll Across Country |
मात्र, आता मंत्रालय नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ शकत नाही. त्यामुळे १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे प्रकल्प मंजुरी केले जातील. तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल. सध्या ५०-६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले आहेत. लवकरच या प्रकल्पांवर काम सुरु होईल, या आर्थिक वर्षात महामार्ग मंत्रालय २०२०-२१ या आर्थिक वर्षातील दररोज ३७ किमी महामार्ग बांधकामाचा विक्रम ओलांडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:





