World Athletics Championships 2023 : राष्ट्रीय विक्रमासह पारूलने मिळवले ऑलिम्पिकचे तिकिट

बुडापेस्ट :- भारताच्या पारुल चौधरीने हंगेरी येथे समाप्त झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये (अडथळ्यांची शर्यत) 11 वे स्थान मिळविले. त्यात तिने 9:15.31 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. यासह पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे.
स्टीपलचेसमध्ये, ब्रुनेईचा ऍथलीट विन्फ्रेड मुटाइल यावीने 8:54.29 च्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या बीट्रिस चेपकोचने हंगामातील सर्वोत्कृष्ट 8:58.98 सह रौप्य पदक जिंकले आणि दुसर्या केनियाच्या फेथ चेरोटिचने 9:00.69 च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक मिळवले.
पारुल चौधरी 200 मीटर स्प्लिटमध्ये स्टीपलचेसमध्ये आघाडीवर होती परंतु तिने गती गमावली आणि 11 व्या स्थानावर राहिली. तथापि, 2900 मीटरच्या स्प्लिटपर्यंत, भारतीय ऍथलीटने शेवटच्या 100 मीटर स्प्लिटमध्ये दोन स्थानांनी झेप घेत 13 व्या क्रमांकावर होता. यासह तिला 11 वे स्थान मिळवता आले.
भारतीय संघाचा 400 मीटर रिलेत विक्रम
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने 400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक संघ पाचव्या स्थानावर राहिला. मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने 2:59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली. यापूर्वी जपानच्या संघाने 400 मीटर रिले शर्यत सर्वात कमी वेळेत 2:59.51 सेकंदात पूर्ण केली होती.





