Omraje Nimbalkar : खासदार ओमराजेंना पहिला मोठा दणका; उद्धव ठाकरेंची साथ सोडणे पडले महागात
Omraje Nimbalkar : धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना पहिला मोठा जमिनीवरील आणि सोशल मीडियावरील दणका बसला आहे.

Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांनंतर सोशल मीडियावर त्यांना मोठा फटका बसल्याचा दावा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे 15 हजार फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केल्याची चर्चा रंगली आहे. (Omraje Nimbalkar)
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्यानंतर ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. (Omraje Nimbalkar)
ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय बैठकीसाठी जारी करण्यात आलेल्या व्हीपकडे दुर्लक्ष करून ओमराजे निंबाळकर अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत अधिक चर्चा सुरू झाली. (Omraje Nimbalkar)
20 जूनला भूमिका स्पष्ट करणार
या सर्व चर्चांदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी 20 जून रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Omraje Nimbalkar)
सोशल मीडियावर अनफॉलो मोहीम?
पक्षांतराच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त होत असल्याचा दावा केला जात आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या खात्यांना मोठ्या प्रमाणावर अनफॉलो करण्यात येत असल्याची चर्चा असून, दोन दिवसांत सुमारे 15 हजार फॉलोअर्स कमी झाल्याचे सांगितले जात आहे. (Omraje Nimbalkar)
सोशल मीडियावर सक्रिय असलेले खासदार
ओमराजे निंबाळकर हे सोशल मीडियावर सक्रिय असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विविध पोस्ट, व्हिडिओ आणि रील्सना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. मात्र, पक्षांतराच्या चर्चेनंतर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, अनफॉलो मोहिमेची चर्चा रंगली आहे. (Omraje Nimbalkar)

धाराशीव जिल्हाप्रमुख रणजित पाटलांचा घणाघात
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशीव जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. रणजित पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट आणि खुलं आव्हान दिले आहे की “तुम्ही आधी तुमची ‘Y+’ सुरक्षा हटवा आणि मग मतदारसंघात येऊन दाखवा, धाराशीवची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल आणि चांगलाच धडा शिकवेल.” (Omraje Nimbalkar)
जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी ओमराजे (Omraje Nimbalkar) यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अत्यंत रोखठोक शब्दांत टीका केली. “ज्या निष्ठेच्या जोरावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झालात, त्या निष्ठेचे तुम्ही पक्षाला हेच फळ दिले का? आज तुमची ओळख एक ‘गद्दार’ म्हणून होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. (Omraje Nimbalkar)





