Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून; ‘वन नेशन-वन इलेक्शन’ मांडले जाण्याची शक्यता

Parliament Winter Session : १८ व्या लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे सत्र २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
यामध्ये वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकासह अनेक विधेयके सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावही मंजूर केला जाऊ शकतो.
८ ऑगस्ट रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ कायदे (दुरुस्ती) विधेयक मांडले. मात्र आता केंद्र सरकारने ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवला आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला.
दरम्यान, ढाक्याचे भारतीय उच्चायुक्त आणि चितगावचे सहयोगी उच्चायुक्त आम्हाला सतत अहवाल पाठवत आहेत. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेची चिंता आहे. गेल्या 24 तासात तेथे बरेच काही बदलले आहे.
हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. या विषयावर आम्हाला सभागृहाचे सहकार्य हवे आहे. बांगलादेश आपल्या खूप जवळ आहे. जानेवारीपासून तेथे तणाव आहे. बांगलादेशात जून-जुलैमध्ये हिंसाचार झाला. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो.
अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हा तिथल्या सर्वात चिंतेचा विषय आहे. शेख हसीना सध्या भारतात आहेत. आम्ही भारतीय समुदायाच्या संपर्कात आहोत. अनेक विद्यार्थी परतले आहेत. आम्ही आमच्या नागरिकांना सुरक्षा देऊ, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.





