Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरा शटलर्स मनदीप कौरचे आव्हान संपुष्टात….

Paris Paralympics 2024 (Badminton Women’s Singles SL3 QF) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवसाची म्हणजेच रविवारची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. भारतीय पॅरा शटलर्स मनदीप कौर हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागले. यासह पॅरिस पॅरालिम्पिकमधील तिचे आव्हान संपुष्टात आलं आहे.
रविवारी महिला एकेरीच्या एसएल3 (SL3) प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत मनदीप कौरला नायजेरियन खेळाडू मरियम बोलाजीकडून पराभव पत्करावा लागला. मनदीप सामन्याच्या सुरुवातीपासूनच लयीत दिसली नाही. नायजेरियाच्या मरियम बोलाजीने पहिला गेम 21-8 असा सहज जिंकला.
🇮🇳 Result Update: #ParaBadminton🏸 Women’s Singles SL3 QF👇
Mandeep Kaur endures a tough defeat in the last 8💔
Following terrific performances in the group stages, Mandeep loses in straight games 2-0 with a scoreline of 8-21 and 9-21 against Nigeria’s Mariam Bolaji.
Be proud… pic.twitter.com/gnEI6B4cC1
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
यानंतर दुसऱ्या गेममध्येही मनदीपला पुनरागमन करता आले नाही आणि नायजेरियन खेळाडूने हा गेमही 21-9 असा जिंकला. अशाप्रकारे नायजेरियन खेळाडूने मनदीप हिचा 21-8, 21-9 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Swapnil Kusale : संयम आणि मेहनतीचे फळ मिळते – स्वप्निल कुसाळे
या वर्षी, भारताने पॅरालिम्पिकसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवली आहे, ज्यामध्ये 12 खेळांमधील 84 खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत.





